Tuesday 17 November 2015

गेल्या वर्षभरात दिल्लीतून महाराष्ट्रासाठी झालेले महत्वाचे निर्णय


      

               मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सक्षम नेतृत्वात
                       राज्यासाठी  दिल्लीतून झाले महत्वाचे निर्णय


मुख्यमंत्री पदाची सूत्रे स्वीकारल्या नंतर देवेंद्र फडणवीस यांनी राज्यात  वेगाने  जनकल्याणाचे निर्णय घेतले तसेच केंद्र सरकारकडूनही राज्याच्या पदरात महत्वाचे निर्णय पाडून घेतले. त्यांच्या पाठपुराव्यामुळे केंद्राकडून मुंबई सागरी मार्गाला मिळालेली मंजुरी,  त्यांच्या पुढाकाराने मुंबईतील इंदुमीलच्या जागेत भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारक उभारणीसाठी झालेला करार, सतत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे दुष्काळ निवारणासाठी  केंद्राकडून राज्याला प्राप्त झालेला आजपर्यंतचा सर्वात जास्त निधी  हे त्याचे ठळक उदाहरणे होत. राज्यातील महत्वाकांक्षी रस्ते प्रकल्प आणि नक्षलग्रस्त भागाच्या विकासासाठी मुख्यमंत्री फडणवीस यांनी केंद्राकडे केलेला पाठपुरावा,नितीआयोगांतर्गत स्वच्छ भारत अभियानासाठी तयार करण्यात आलेल्या  मुख्यमंत्र्यांच्या उपगटांच्या विविध बैठकीत मांडलेले महत्वपूर्ण मुद्दे व त्याचा स्वीकार या बाबींही दिल्लीत त्यांची वेगळी छाप सोडून गेल्या.                                      
                             
        दिल्लीतून महाराष्ट्रासाठी झालेले महत्वाचे निर्णय

                 मुंबई सागरी मार्ग प्रकल्पाला मंजुरी  ( ८ जून २०१५)
·        मुंबईकरांचा प्रवास सुखकर करू शकण-या आणि आंतराष्ट्रीय तंत्रकौशल्याचा नमुना ठरेल अशा ३४ किलो मीटर लांबीच्या 'मुंबई सागरी मार्ग प्रकल्पाला'  केंद्रीय पर्यावरण व वने मंत्रालयाने मंजुरी दिली.
                                     भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक   (५ एप्रिल २०१५)
·        मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकाराने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे भव्य स्मारक उभारण्यासाठी मुंबईतील इंदू मिलची जागा राज्य सरकारला हस्तांतरित करण्यासंबंधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत त्रिपक्षीय करार.
                           रेल्वे अर्थ  संकल्पात महाराष्ट्र  (२६ फेब्रुवारी २०१५)
·        महाराष्ट्रातील विविध रेल्वे प्रकल्पासाठी रेल्वे अर्थ् संकल्पात एम.यु.टी.पी अंतर्गत (Mumbai Urban Transport Project)  रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांनी सुमारे 11 हजार 441 कोटी रुपयांचे प्रकल्प प्रस्ताववित केले आहेत.  तर राज्यातील इतर रेल्वे प्रकल्प विकासासाठी 3 हजार 376 कोटी रुपयांची तरतूद केली आहे. रेल्वे मार्गाचे दुपदरीकरण, चौपदरीकरण  तसेच रेल्वे स्थानकांचा विकास,  नवीन रेल्वे मार्ग आदी योजनांसाठी ही तरतूद करण्यात आली.
                 अर्थ संकल्पात महाराष्ट्र  ( 28 फेब्रुवारी 2015)
·        महाराष्ट्रातील औरगांबाद जिल्ह्यातील शेंदरा-बिडकीन येथे औद्योगिक क्षेत्र उभारण्यसह दिल्ली-मुंबई औद्योगिक कॉरिडोर, गुजरात राज्यात अहमदाबाद-धौलेरा गुंतवणूक क्षेत्र उभारण्यासाठी अर्थ संकल्पात एकूण 1200 कोटी रूपयांची प्रारंभिक तरतूद करण्यात आली.

·        देशातील जागतिक दर्जाचे 25 सांस्कृतिक केंद्राचा विकास करण्यात येणार असून यामध्ये मुंबईतील एलीफंटा लेण्याचा समावेश करण्यात आला .

·        देशातील मेट्रो योजनांसाठी अर्थसंकल्पात 8 हजार 260 कोटींची तरतूद करण्यात आली असून महाराष्ट्रातील नागपूर व मुंबईच्या मेट्रो योजनांचा समावेश करण्यात आला.
              
           
                                दुष्काळग्रस्त भागासाठी मदत
·        राज्यातील दुष्काळग्रस्त भागासाठी केंद्रीय कृषी मंत्री राधा मोहन सिंह यांनी २ हजार कोटी रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली. (24 मार्च 2015)
                           महाराष्ट्रातील रेल्वे प्रकल्प पूर्ण करण्याकरिता कंपनी
·        महाराष्ट्रातील रेल्वे प्रकल्प पूर्ण करण्यासाठी राज्य सरकार आणि   रेल्वे मंत्रालय एक कंपनी स्थापन करणार असल्याची माहिती रेल्वे मंत्री सुरेश प्रभु यांनी उत्तर रेल्वेच्या मुख्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत दिली.   ( 11 जून 2015)
                           महाराष्ट्रातील  ३८ रेल्वे स्थानकांचा पुनर्विकास
·        महाराष्ट्रातील 38 रेल्वे स्थानकांसह देशातील 407 रेल्वे स्थानकांचा पुनर्विकास करण्याचा निर्णय केंद्रीय मंत्रीमंडळाने घेतला.(16 जुलै 2015)
                स्मार्ट सिटी योजनेसाठी महाराष्ट्रातील १० शहरांची निवड                                                
·        केद्रीय नगर विकास मंत्री एम.व्यंकय्या नायडू यांनी देशातील 98 शहरे स्मार्ट शहरे म्हणून विकसीत होणार असल्याची घोषणा केली यात महाराष्ट्रातील 10 शहरांचा समावेश आहे.
नगर विकास मंत्रालयाच्या यादीत राज्यातील नवी मुंबई,नाशिक,ठाणे, बृहन्मुंबई, अमरावती ,सोलापूर, नागपूर, कल्याण –डोंबिवली, औरंगाबाद,पुणे या शहारांचा समावेश. (27 सप्टेंबर 2015)
                   महाराष्ट्रातील स्मार्ट शहरांसाठी केंद्राकडून २० कोटींचा निधी मंजूर                                          
·        स्मार्ट सिटी योजनेत निवड झालेल्या महाराष्ट्रातील १० शहरांना स्मार्ट सिटीचे शहर नियोजन तयार करण्यासाठी प्रत्येकी २ कोटी असा एकूण २० कोटी रूपयांचा निधी मंजूर झाला. ( 3 ऑक्टोबर 2015)
                    नागपुरात एम्स उभारण्यास केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी
·        नागपूर शहरात अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था (ऑल इंडिया इंस्टिटयूट ऑफ मेडिकल  
           सायंसेसे-एम्स) उभारण्यास  केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली .यासाठी १ हजार ५७७ कोटी
           रूपयांची तरतूदही करण्यात आली आहे. ( 7 ऑक्टोबर 2015)
                                                     पुणे मेट्रोबाबत महत्वपूर्ण निर्णय

·        पुणे मेट्रो प्रकल्पाच्या दोन्ही टप्प्याचे काम लवकर सुरु करणे, पुणे विमानतळ विस्तारीकरणाचे व रिंग रोडचे कामही लवकरच हाती घेण्याचा निर्णय महाराष्ट्र सदन येथे केंद्रीय मंत्री, पुण्यातील लोकप्रतिनिधी आणि प्रशासकीय अधिका-यांच्या उपस्थितीत बैठक.  ( 9 सप्टेबर 2015)